शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा यासाठी गेले काही दिवस प्रयत्न सुरू आहेत. या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी वादग्रस्त विधान केल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. मासिकपाळीदरम्यान तुम्ही मंदिरात कसे काय प्रवेश करु शकता?' असा सवाल उपस्थित करत 'रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही मित्राच्या घरी घेऊन जाऊ शकता का?' मग मंदिरात कसा प्रवेश करू शकता ? अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर स्मृती इराणींवर टीका झाली होती.
सामान्य नागरिकांपासून अगदी सोशल मीडियामध्ये स्मृती इराणींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यानंतर काही दिवस शांत असलेला स्मृती इरणींना आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिले आहे.
स्मृती इराणींनी इंस्टाग्रामवर एक मिम शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये, ' हम बोलेगा तो बोलेंगे की बोलता है' असं म्हणतं क्यु की सांस भी... मालिकेतील तुलसीचा एक मुसक्या आवळलेला फोटो त्यांनी शेअर केला आहे.
'आपल्याला पूजा करण्याचा अधिकार आहे. पण, अपवित्र करण्याचा नाही. या फरकाचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे, असे स्मृती इराणींनी सांगितले आहे.