Grenade Attack (Representational Image/ Photo Credit: Getty)

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir's) बडगाम जिल्ह्यात (Budgam District) दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात (Grenade Attack) केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 6 जण जखमी झाले आहेत. मध्यवर्ती काश्मीर जिल्ह्यातील चारारे-शरीफ भागातील पाखेरपोरा येथील बसस्थानकाजवळ सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. या स्फोटात सीआरपीएफचा एक जवान, एक पोलिस आणि चार नागरिक जखमी झाले आहेत.

स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, पाखरपोरा येथे केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांच्या 181 बटालियन संयुक्तरित्या तैनात करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला आहे. (हेही वाचा - Coronavirus: दिल्लीतील CISF च्या कर्मचार्‍यांकडून एक दिवसाचा पगार पीएम केअर फंडमध्ये जमा)

या हल्ल्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाम रसूल, उर्फ ​​दिलवार, सीआरपीएफचे कॉन्स्टेबल संतोष कुमार आणि चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पाखरपोरा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली आहे.