Anuradha Paudwal Joins BJP (PC -X/ @ians_india)

Anuradha Paudwal Joins BJP: 80 आणि 90 च्या दशकात हिट गाणी आणि भक्ती संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका अनुराधा (Anuradha Paudwal) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections 2024) भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी पौडवाल यांनी सांगितलं की, सनातनशी (धर्माचा) सखोल संबंध असलेल्या सरकारमध्ये मी सहभागी होत आहे याचा मला आनंद आहे. आज मी भाजपमध्ये सामील होत आहे हे माझे भाग्य आहे.

पौडवाल यांनी अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राम भजन सादर केले होते. पत्रकार परिषदेत त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, 'मला अद्याप माहित नाही, ते मला जे काही सूचना देतील ते मला कळेल.' (हेही वाचा - Joint Lok Sabha And Assembly Elections: 2029 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास 8000 कोटी रुपयांचा खर्च येणार; निवडणूक आयोगाची माहिती)

भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशातील राज्यसभा सदस्य अजय प्रताप सिंग यांनी त्यांच्या पक्षाकडून नामांकन न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे काही तासांनंतर अनुराधा पौडवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.