सध्या सोशल मीडियावर पार्न व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर 'चाईल्ड पॉर्न' (Child Porn) शेअर करणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या एका एजन्सीच्या तसेच 'नॅशनल क्राईम ब्युरो'च्या सूचनेवरून या 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक 61 वर्षीय व्यक्तीही सामील आहे. हा आरोपी एक किराणा मालाचे दुकान चालवतो. त्याने फेसबुकवर 19 वर्षीय तरुणाचे प्रोफाइल बनवले होते. त्यावर तो पॉर्न शेअर करत असे. (हेही वाचा- लज्जास्पद! पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके)
संजू राठोड (वय 25), अमित मंडल (वय 24), नरेंद्र कुमार (वय 22), रेवती नंदन आनंद (वय 34), लोकराज यजुर्वेदी (वय 61) आणि सुदामा राम (वय 29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करत असत.
हेही वाचा - धक्कादायक! विद्यार्थ्यांना समजावे म्हणून शिक्षकांनी वर्गातच दाखवले बलात्काराचे प्रात्यक्षिक; गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी MASOOM (Mitigation of Adolescent Sexually Offensive Online Material) अंतर्गत या आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सोशल मीडियावरील चाईल्ड पॉर्न व्हिडिओ डाऊनलोड करत होते. त्यानंतर ते सोशल मीडियावर अपलोड करून शेअर करत होते, असं पोलिस उपायुक्त अनेश रॉय यांनी सांगितले. यासंदर्भात आणखी तपास सुरू असल्याचंही रॉय यांनी यावेळी सांगितलं.