कविता आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramads Athawale) यांचा एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आठवले कॅण्डल मार्चच्या वेळी "गो-कोरोना, गो-कोरोना" (Go Corona) अशी घोषणाबाजी करताना दिसले. आठवले मागील महिन्यात कोरोना व्हायरसबद्दल (Coronavirus) जनजागृती करण्यासाठी कॅण्डल मार्चमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर "गो-कोरोना, गो-कोरोना" असे नारे लगावले. आठवले यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. आठवले यांच्या त्या नाऱ्यावर यूजर्सना आपले हसू अनावर झाले. भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत गेल्यावर 'गो-कोरोना' ची घोषणा सर्वजण करू लागले. 20 फेब्रुवारी रोही आठवले यांनी ही घोषणाबाजी केली होती आणि आता भारतभर सर्वजण 'गो कोरोना' म्हणताना दिसून येत आहे. (Coronavirus: कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय Watch Video)
एएनआयशी बोलताना आठवले म्हणाले,"20 फेब्रुवारी रोजी जेव्हा कोविड-19 ची स्थिती भारतात तितकी वाईट नव्हती, तेव्हा मी 'गो कोरोना, कोरोना गो' अशी घोषणा दिली. त्यावेळी लोकं म्हणत होते की यामुळे कोरोना निघून जाईल? आता आम्ही ही घोषणा जगभर पहात आहोत."
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 6, 2020
दरम्यान, भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4000 पार गेली असून 100 हुन अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या 4,000 रुगांपैकी 3666 सक्रिय आहेत, तर 292 बरे/सोडण्यात आले/स्थलांतरित झाले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील 12 तासात 490 अधिक रुग्नांची नोंद झाली आहे. हा आजार भारतासह जगभर वेगाने पसरत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.