IAF Airlifts Doctors for Liver Transplant: देशातील नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय हवाई दल (Indian Air Force) नेहमीच पुढे असते. अशातचं आता भारतीय हवाई दलाचे शौर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. वास्तविक, शुक्रवारी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी वेळ न दवडता तातडीने विमानाने पुण्याहून लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक दिल्लीला रवाना केले, त्यामुळे एका माजी सैनिकाचे प्राण वाचू शकले. भारतीय हवाई दलाच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. वायू सेनेने आज पुन्हा एकदा सर्वांसमोर मानवतेचा आदर्श ठेवला आहे.
भारतीय वायुसेनेने डॉक्टरांच्या टीमला केलं एअरलिफ्ट -
न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने आपल्या डॉर्नियर विमानाच्या मदतीने माजी सैनिकाचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमला एअरलिफ्ट केले आहे. त्यांनी पुण्याहून डॉक्टरांचे पथक दिल्लीला पाठवले. हवाई दलाच्या तत्परतेमुळे रुग्णाचा जीव वाचला. (हेही वाचा - Indian Air Force: भारतीय वायुसेनेचा मोठा निर्णय, MiG-21 लढाऊ विमानांची सर्व उड्डाणे बंद, झालेल्या अपघाताची होणार चौकशी)
An IAF Dornier aircraft was activated at short notice to airlift a team of doctors of Army Hospital (R&R), to retrieve a liver from Pune to Delhi during the night on 23 Feb 24.
The subsequent transplant surgery helped save the life of a #Veteran.#HarKaamDeshKeNaam #SavingLives pic.twitter.com/RoDkqsrSOt
— Indian Air Force (@IAF_MCC) February 25, 2024
रुग्णाचा वाचला जीव -
भारतीय वायुसेनेने सांगितले की, 23 फेब्रुवारीच्या रात्री त्यांना माहिती मिळाली होती की डॉक्टरांचे एक पथक पुण्याहून दिल्लीला एअरलिफ्ट करायचे आहे. डॉक्टरांना रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करायचे होते. यानंतर वायू सेनेने तात्काळ आयएएफने एअरलिफ्टसाठी डॉर्नियर विमानाची निवड केली. प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने रुग्णाचा जीव वाचू शकतो, असे हवाई दलाने सांगितले. यानंतर भारतीय वायूदलाने क्षणाचाही विलंब न करता रुग्णावर यकृताचे प्रत्यारोपण करण्यासाठी डॉक्टरांची टीम पुण्याहून दिल्लीला पोहोचवली.