Road Like Hema Malini's Cheeks: सध्या देशभरात निवडणूकांचे वारे वाहत आहेत. विविध पक्षांचे नेते लोकांमध्ये जाऊन विविध वक्तव्य करतात. त्यातच आता आपचे आमदार नरेश बल्यान (Naresh balyan)यांनी भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपने त्यांच्या एका विधानावरून त्यांना घेरले असून. त्यांचे विधान महिलांचा अपमान असल्याचे म्हणत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे आमदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे हा संपूर्ण वाद?
दिल्लीच्या उत्तम नगरमधील आपचे आमदार नरेश बल्यान यांनी एका व्हायरल व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, '35 तारखेपर्यंत आम्ही उत्तम नगरच्या रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवू.' हे विधान समोर येताच भाजपने हा महिलांचा अपमान असल्याचे सांगत केजरीवाल यांना बल्यान यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. हेमा मालिनी या मथुरेच्या लोकसभा खासदार आहेत आणि त्यांची अशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला आहे.
दिल्ली भाजपचा पलटवार
या वादग्रस्त वक्तव्यानंतर दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमदार नरेश बल्यान यांनी केवळ महिलांचा अपमानच केला नाही तर परिसरातील जनतेची चेष्टाही केली आहे. कपूर म्हणाले, 'महिलांचा अपमान करणे ही आम आदमी पार्टीची सवय झाली आहे. केजरीवाल यांनी महिन्यातील 35 दिवसांचे कॅलेंडर बनवलेले दिसते.
"We will make roads of Uttam Nagar smooth as Hema Malini's cheeks"
AAP MLA Naresh Balyan
केजरीवाल के गाल चिकने नहीं है 🤔pic.twitter.com/S6dvEmwI8r
— Kreately.in (@KreatelyMedia) November 4, 2024
केजरीवाल यांच्याकडून कारवाईची मागणी
केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी या प्रकरणाची दखल घेतील आणि नरेश बल्यान यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल पक्षातून काढून टाकतील, अशी दिल्लीच्या लोकांना आशा आहे, असे भाजपचे प्रवक्ते म्हणाले. आत्तापर्यंत या विषयावर ना आम आदमी पक्षाचे आमदार बल्यान आणि ना आम आदमी पक्षाने कोणतेही वक्तव्य केले आहे.