Ratan Tata Awarded Sewa Ratna: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना शुक्रवारी RSS-संलग्न सेवा भारती (Seva Bharti) ने परोपकाराच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल 'सेवारत्न' (Seva Ratna) पुरस्कार प्रदान करण्यात आला. रतन टाटा यांची अलीकडेचं पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी (PM-CARES) च्या नवीन विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती झाली. रतन टाटा यांच्याशिवाय चालसानी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रख्यात आणि प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांच्या 'सामाजिक कार्यातील अमूल्य योगदान किंवा सामाजिक विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल' हा सन्मान देण्यात आला, असे सेवा भारती यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
सेवा भारतीने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरुमित सिंग (निवृत्त) यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या निःस्वार्थ समाजसेवेसाठी चोवीस इतर मान्यवर आणि संस्थांनाही पुरस्कार देण्यात आला. (हेही वाचा - Medical Education in Hindi: आता चक्क हिंदीतून होणार MBBS चे शिक्षण; गृहमंत्री अमित शाह करणार पुस्तकांचे अनावरण)
रतन टाटा आणि सीबी राजेंद्र प्रसाद यांना शुक्रवारी सेवा भारती, त्यांच्या धर्मादाय क्षेत्रातील कार्यासाठी 'सेवारत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी एका कार्यक्रमात 24 इतर मान्यवरांचा आणि संस्थांचा त्यांच्या निस्वार्थी समाजसेवेसाठी पुरस्कार प्रदान केला. सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सेवेचा अर्थ सेवा भारती कडून शिकता येतो, जी निःस्वार्थता प्रतिबिंबित करते. ज्याच्याकडे कोणी नाही त्याची सेवा भारती असते.
या पुरस्कार सोहळ्याला रतन टाटा उपस्थित राहू शकले नाहीत. सेवा भारतीने एका निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक कार्यात अमूल्य योगदान किंवा सामाजिक विकासासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.