Rape: शिकवणीवरून घरी परत येत असणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार, शेजाऱ्यावर गुन्हा दाखल
Representational Image (Photo Credits: ANI)

ढोलेवाल (Dholewal) येथे त्याच्या शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. साहिबजादा अजितसिंग नगर येथील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी तिची मुलगी शिकवणीवरून परतत असताना आरोपीने तिला अडवले. आरोपी तिला जबरदस्तीने परिसरातील एका मोकळ्या प्लॉटवर घेऊन गेला. जिथे त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा माझ्या मुलीने आरडाओरडा केला तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, तिने पोलिसांना सांगितले. हेही वाचा Ayodhya ShriRam Mandir: अयोध्येत श्रीराम मंदिरातील गर्भगृहात 24 जानेवारी 2024 रोजी विराजमान होणार रामलल्ला

उपनिरीक्षक मधु बाला, विभाग क्रमांक 6 चे एसएचओ यांनी सांगितले की, कलम 376 (बलात्कार), 511 (गुन्हा करण्याचा प्रयत्न), आणि 506 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कलम 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेचा शोध सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.