Randeep Surjewala's Election Campaign Banned: रणदीप सुरजेवाला यांच्या निवडणूक प्रचारावर 48 तासांची बंदी; हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई
Randeep Surjewala, Hema Malini (PC - FB and ANI)

Randeep Surjewala's Election Campaign Banned: काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्या निवडणूक प्रचारावर 48 तासांची बंदी घातली आहे. रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने (Election Commission) ही कारवाई केली आहे. या कालावधीत ते कोणत्याही मुलाखती, रोड शो, जाहीर सभा किंवा प्रसारमाध्यमांमध्ये कोणतेही वक्तव्य करू शकणार नाहीत. छत्तीसगडमध्ये एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणातील कैथल येथे जाहीर सभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुरजेवाला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. व्हिडिओमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, असेही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Electoral Bond Case: 'इलेक्ट्रोल बॉन्ड ही देशातील सर्वात मोठी जुगार योजना'; राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका (Watch Video))

निवडणूक आयोगाने बजावली नोटीस -

सुरजेवाला यांच्या या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने 9 एप्रिल 2024 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. उत्तर देण्यासाठी सुरजेवाला यांच्याकडे 11 एप्रिलपर्यंतचा वेळ होता. निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून सार्वजनिक वादविवादांदरम्यान महिलांचा सन्मान राखण्याच्या आदेशाचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी कोणती पावले उचलली याची माहितीही मागवली होती. सुरजेवाला यांना 11 एप्रिलपर्यंत तर खरगे यांना 12 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता.

भाजपने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार -

हरियाणातील प्रचारादरम्यान सुरजेवाला यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना सुरजेवाला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक प्रचाराला महिलांचा अपमान करण्याचे व्यासपीठ बनू दिले जाऊ शकत नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.