Ram Mandir Pran Pratishtha: मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

अयोध्येत (Ayodhya) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात सोमवारी (22 जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) केली जाणार आहे. संपूर्ण देशभर या सोहळ्याची चर्चा आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टने सोमवारी अयोध्येत मोठ्या उत्सवाचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत (Mohan Bhagwat) या तिघांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यातही राममय वातावरण तयार झाले आहे. (हेही वाचा - Mukesh Ambani House Antilia: मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया झाले राममय, व्हिडिओ व्हायरल)

मुंबईत ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्या माध्यमातून भव्य असे 50 फुटी राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने कलश यात्रा, होम हवन आणि रामलीला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी या मंदिराच्या प्रतिकृतीला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.

दगडूशेठ मंदिरा समोर फुलांनी सजावट केलेली अक्षर जय श्रीराम अस फुलांनी लिहिण्यात आलं आहे. तर फुलांमध्येच आयोध्यामधील श्रीराम मंदिर, भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांची चित्र काढण्यात आली आहेत. ती पाहण्यासाठी लोकांचे आतापासूनच गर्दी पाहायला मिळत आहे.