Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Rajasthan Earthquake: राजस्थानमध्ये भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. ज्यामुळे नागरिक काहीसे घाबरले आहेत. सीकर जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. शनिवारी रात्री 11.47 च्या सुमारास शेखावती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के(Earthquake) बसले. राजस्थान(Rajasthan )च्या खाटू श्यामजीमध्ये काही सेकंदांसाठी जमिन हादरल्याच नागरिकांच म्हणणं आहे. त्याशिवाय भुंपाचा परभाव रिंगा आणि धोड शहरातही दिसून आला. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (एनएसएमसी) नुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा:Earthquake in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग भागात भूकंप, रिश्टर स्केलवर 3.0 तीव्रता)

18 फेब्रुवारी 2023 रोजी सीकरमध्येही भूकंप

यापूर्वी 18 फेब्रुवारी 2023 रोजीही सीकरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी सकाळी ८.०१ वाजता भूकंप झाला. हवामान केंद्राचे संचालक राधेश्याम शर्मा यांनी सांगितले होते की, भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर होती. ज्याचे केंद्र देवगड, सीकर होते. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता.