Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Rajasthan: राजस्थानच्या प्रतापगडमध्ये एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या, परिसरात दहशतीचे वातावरण

राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील खेरोत गावात एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, त्यानंतर संतप्त स्थानिकांनी हत्येच्या निषेधार्थ महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक हेरंब जोशी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा जयसिंग आणि इतर तीन-चार जणांनी घनश्याम प्रजापत यांची घराबाहेर वार करून हत्या केली.

राष्ट्रीय Shreya Varke | Jun 25, 2024 05:44 PM IST
A+
A-
हल्ला | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Rajasthan: राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील खेरोत गावात एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, त्यानंतर संतप्त स्थानिकांनी हत्येच्या निषेधार्थ महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक हेरंब जोशी यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा जयसिंग आणि इतर तीन-चार जणांनी घनश्याम प्रजापत यांची घराबाहेर वार करून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, हत्येनंतर संतप्त स्थानिकांनी प्रतापगड-रतलाम महामार्ग रोखून धरला. जोशी म्हणाले, "मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे."

आंदोलकांना महामार्गावरून हटवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचे जोशी यांनी सांगितले.


Show Full Article Share Now