Job ( Photo Credit - File Image)

जर तुमच्याकडे सिविल किंवा मेकॅनिकल इंजिनियरची डिग्री असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियर आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट पदांवर नोकर भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी योग्य उमेदवारांनी अर्ज करावे असे आवाहन जाहीर करण्यात आलेल्या परिपत्राकातून केले आहे. 7 फेब्रुवारीला वॉक इन इंटरव्यूसाठी सुद्धा उमेदवारांना जाता येणार आहे.

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, इंटरव्यूसाठी एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-40, सीवूड (वेस्ट) नवी मुंबई-4007706 येथे यावे. यासाठी रजिस्ट्रेशन सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना या पदांवर अर्ज करायचा आहे त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून कमीत कमी 50 टक्के गुणांसह सिव्हिल/मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा त्या संबंधित अनुभव असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्ष असावे. या व्यतिरिक्त सीनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्याचे वय 35 वर्ष असावे. (हे ही वाचा रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रवासी आणि स्कूल बसमध्ये फायर अलार्म यंत्रणा बसवणे केले बंधनकारक, अपघात रोखण्यास होणार मदत

या पदावरील उमेदवारांना नवी दिल्ली, रायपुर, सुरत, अंबाला, नागपुर आणि अन्य ठिकाणी नोकरी दिली जाणार आहे. अर्जामधील कागदपत्रांची वेरिफेशन झाल्यानंतरच उमेदवारांना इंटरव्यूसाठी बोलावले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://konkanrailway.com/ येथे भेट द्यावी.