गृहमंत्री राजनाथ सिंह (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Pulwama Terrorist Attack: गुरुवारी (14 फेब्रुवारी) रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. त्यामुळे देशभरातून या दशहतवादी हल्ल्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. आज शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सकाळी कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्वाची बैठक होणार आहे. या परिस्थित गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी जम्मू-काश्मिरचे सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधून सिंह शुक्रवारी घटनास्थळी भेट देणार आहेत.

आजच्या बैठकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहार येथील सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच नेटकऱ्यांकडून मोदीजींना विनवणी करत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक व्हायला हवा असे सांगण्यात येत आहे. जम्मू- काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti)यांनीसुद्धा या दहशतवादी हल्ल्याचा निषेद केला आहे. मोदी यांनी जवांनाचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे आश्वासन दिले आहे.(हेही वाचा-Pulwama Terrorist Attack: दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद; पंतप्रधान म्हणाले 'जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही')

'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने या हल्लयाची जबाबदारी स्वीकारली आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये सुरक्षादलावर हल्ला झाला होता. त्यानंतर असाच प्रकारचा मोठा हल्ला गुरुवारी झाला. हा हल्ला श्रीनगर-जम्मू हायवनजीक अवंतिपोरा परिरसारत झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या तळाला लक्ष्य बनवले.मात्र, या हल्ल्याला भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळावे अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनीही दहशतवाद्यांना धडा शिकवू असे म्हटले आहे.