Shocking! रेल्वे स्थानकावर मुलांसह पतीसोबत झोपली होती गर्भवती महिला; नराधमांनी कुटुंबासमोरचं केला सामूहिक बलात्कार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात अतीशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रेपल्ले रेल्वे स्टेशन (Repalle Railway Station) वर गर्भवती महिलाचा (Pregnant Woman) तिच्या कुटुंबियासमोर सामुहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला. तीन नराधमांनी हे लाजिरवाणे कृत्य केले. आरोपींनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यांनी आरडाओरडा करत रेल्वे पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मदत मिळू शकली नाही.

महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री हे कुटुंब कामाच्या शोधात गुंटूरहून कृष्णा जिल्ह्यात जात असताना ही घटना घडली. हे कुटुंब प्रकाशम जिल्ह्यातील आहे. (हेही वाचा -Crime: पुस्तक आणि पेन्सिल न आणता शाळेत आल्याने 7 वर्षीय मुलीला शिक्षकाची अमानुष मारहाण)

पोलिसांनी रविवारी सांगितले की, प्रकाशम जिल्ह्यातील येरागोंडापलेम येथील रहिवासी असलेले एक जोडपे कृष्णा जिल्ह्यातील नागयलंका गावात शेतीच्या कामासाठी जात असताना शनिवारी रात्री रेपल्ले रेल्वे स्थानकावर ते दोघे रेल्वेतून उतरले. रविवारी सकाळी दोघेही नागयलंकाकडे जाताना फलाटावर झोपले.

त्यानंतर तिघेजण तेथे आले आणि त्यांनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिघांनी दाम्पत्याकडून पैसे हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. पतीने पळून जाऊन रेल्वे पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्टेशनवर कोणीही अधिकारी सापडला नाही.

रेपल्ले रेल्वे स्टेशन (Repalle Railway Station) राज्याची राजधानी अमरावतीपासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रेपल्ले येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बापटला पोलीस अधीक्षक (एसपी) वकुल जिंदाल यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी बापटलाच्या एसपीशी बोलून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.