प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट Jawed Habib यांचा 'BJP'मध्ये प्रवेश; केसांचे चौकीदार आता झाले देशाचे चौकीदार
Jawed Habib joins BJP. (Photo Credits: ANI)

प्रसिद्ध हेअर स्टाइलिस्ट आणि सलून चेनचे मालक जावेद हबीब  (Jawed Habib) यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पक्षप्रवेशाचे फोटो व्हायरल झाले आहे. ‘आधी मी फक्त केसांचा चौकीदार होता, आता देशाचा चौकीदार झालो’, असे म्हणत त्यांनी पक्षात प्रवेश केला. फोटोमध्ये हबीब यांच्या गळ्यात कमळाचे निशाण असणारे उपरणे आणि मागे भारतीय जनता पक्षाचे बॅनर दिसत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्याला एक दिवस बाकी असताना हबीब यांनी भाजपचा हात पकडला आहे. उद्या, 23 एप्रिल रोजी, देशातील 14 राज्यांमध्ये, 115 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत.

 

दरम्यान, जावेद हबीब यांचे 24 राज्यांमध्ये, 110 शहरांमध्ये 846 सलून आहेत. जवळजवळ 15 लाख जनता या सलूनची ग्राहक आहे. यावर्षी राजकारणात उतरलेल्या सेलेब्जमध्ये उर्मिला मातोंडकर, नुसरत जैन, मिमि चक्रवर्ती, प्रकाश राज आणि शिल्पा शिंदे ही काही प्रमुख नावे आहेत.