विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सोमवारी औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली आहे. लाचखोरीत गुंतलेल्या ठाकरे सरकारला (Thackeray Govt) मराठवाड्याची (Marathwada) चिंता राहिलीच नाही आहे, ज्या शिवसेनेला मराठवाड्याने नाव दिल त्या शिवसेनेला आज मराठवाड्याचा विसर पडला आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे विविध योजनांच्या लाभार्थींच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठवाडा हा केवळ अनेकांच्या भाषणात असून मराठवाडा त्यांच्या मनात नाही. मराठवाडा मनात असता तर मराठवाडा, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे कवच अनेक वर्षांच्या संघर्षानंतर निर्माण झाले असते, असा आरोप फडणवीस यांनी केला.
Tweet
LIVE | महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा, लासूर स्टेशन, गंगापूर.#BJP #development https://t.co/p16SVK26Zp
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 21, 2022
मराठवाड्याला पैसे दिले की नाही याने काही फरक पडत नाही. या सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद उरलेली नाही. एवढेच नाही तर ज्या मराठवाड्याला शिवसेनेचे नाव दिले, त्याच मराठवाड्याचा आज शिवसेनेला विसर पडल्याचेही फडणवीस म्हणाले. आमच सरकार असताना आम्ही प्रत्येत वेळी मदत केली आहे पण हे सरकार कोणतीच मदत करत नाही, असे ही फडणवीस म्हणाले. (हे ही वाचा Kirit Somaiya on Sanjay Raut: 'भxx शब्दाचा अर्थ माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा' संजय राऊत यांच्यावर भडकले किरीट सोमय्या)
मुंबईतील सर्वात उंच इमारतीत हे सरकार हरवले आहे. हे सरकार दलदलीत आहे. फडणवीस म्हणाले, त्यांना मराठवाडा माहीत नाही, मराठवाड्यात शेतकरी काय करतो ते माहीत नाही, शेतमजूर इथे कसा राहतो, हे त्यांना माहीत नाही. त्याचबरोबर बड्या लोकांची थकबाकी असूनही वीज कनेक्शन कापले जात नसून, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. शेतकऱ्यांची बिले न भरल्याने वीज जोडणी कापली जात आहे. पण आम्ही सरकारमध्ये असताना असे झाले का? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.