Sanjay Raut : किरीट सोमय्या यांच्या पत्नीने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत संजय राऊत यांना समन्स
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

राज्यात पुन्हा एकदा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) विरुध्द संजय राऊत (Sanjay Raut) असा सामना बघायला मिळणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरुध्द मानहानीचा खटला दाखल केला होता. संबंधित प्रकरणी माझगाव (Mazgaon) दंडाधिकारी न्यायालयाने (District Court) संजय राऊत यांना समन्स (Summons) बजावला असुन राऊतांना 6 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी या समन्सला संजय राऊत काय उत्तर देणार हे बघणं महत्वाच ठरणार आहे. शिवसेना विरुध्द सोमय्या हा वाद राज्याच्या राजकारणात खुप जुना असला तरी थेट संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा यावरुन वाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

संजय राऊत वारंवार मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळ्यात (Toilet Scam) भ्रष्टाचार केला असा दावा करत होते. सोमय्यांनी या योजनेत अनेक कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप संजय राऊतांनी केले होते. तर आरोपांविरुध्द काही महिन्यापूर्वी किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा (Defamation Case) केला होता. संबंधीत प्रकरणाची दखल माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे. (हे ही वाचा:-MSRTC Bus Accident Indore: इंदोर बस अपघातात मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एस टी महामंडळाला निर्देश)

 

मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले. त्यापैकी 16 शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आले होते. संबंधीत बांधकामात बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मेधा सोमय्या हे युवा प्रतिष्ठान चालवतात आणि त्यांनी टॉयलेट घोटाळ्यात बनावट कागदपत्राद्वारे खोटी बिले काढून पैसे उकळलेत असे गंभीर आरोप संजय राऊतांनी मेधा सोमय्यावर केले होते पण संबंधित सगळे आरोप खोडून काढत आता सोमय्यांनी संजय राऊतांविरुध्द मानहानीचा दावा केला आहे. तरी माझगाव समन्स ला राऊत काय उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.