Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

सद्या राज्य भरात राज्य शासनेने सुरु केलेले शासन आपल्या दारी (Shashan Aaplya Dari) उपक्रम चालू आहे. रत्नागिरी, सिधुंदुर्ग, सातारा ह्या जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात शासन आपल्या दारी कार्यक्रम झाले. काल  15 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या अध्यक्षते खाली पालघर येथे ह्या शासन आपल्या दारी अभियानाचे आयोजण करण्यात आले. ह्या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. आधीचे सरकार त्यांच्या घरी होते आणि हे सरकार  आपल्या दारी आहे, अश्या बोचऱ्या शब्दात त्यांच्यावर टिका केली. एवढेच नव्हे तर ह्या दोन सरकार मधील फरक सुध्दा सांगितले. हे सरकार तुमच्या पर्यंत लाभ पोहचवण्याचे काम करते असे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  (हेही पहा -शासन आपल्या दारी, सर्वसामान्यजनतेचे काम होणार भारी )

अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्याला 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा देण्यात आला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासनाच्या विविध याेजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र,  यंत्रसामुग्री, वस्तूंचे वाटप करण्यात आले.