महाविकासआघाडी सरकारचे गणपतीसोबत विसर्जन होईल- रामदास आठवले
Ramdas Athawale (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. गणपती विसर्जनासोबत (Ganpati Visarjan) या सरकारचेही विसर्जन होईल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत जो निर्णय दिला त्यानंतर आठवले प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आठवले यांनी या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सीबीआय या प्रकरणाच्या तळाशी जाईन आणि या प्रकरणातील सत्य शोधून काढेन, असेही आठवले या वेळी म्हणाले.

मुंबई पोलिसांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेतला. अनेक जणांचे जबाब नोंदवूनही मुंबई पोलिसांच्या तपासा विशेष असे काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी संपूर्ण देशातून मागणी होऊ लागली , असा आरोपही रामदास आठवले यांनी या वेळ केला.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, एकूण प्रकरणाचा तपास आणि परिस्थिती पाहता असे वाटत आहे की, मुंबई पोलीस महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत किंवा कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक या प्रकरणात सहभागी आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असेही रामदास आठवले या वेळी म्हणाले. (हेही वाचा, पार्थ पवार म्हणतात 'सत्यमेव जयते', सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सूचक ट्विट. )

मुंबई पोलीसांची प्रतिमा ही संपूर्ण देशात अव्वल क्रमांकाची आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा अशा पद्धतीने घराब होणे हे योग्य नाही. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची अनेक प्रकरणं हाताळली आहेत. काही प्रकरणात तर मुंबई पोलिसांनी इतकी चांगली कामगिरी केली आहे की, आरोपींनी कोणत्याही प्रकारचा पुरावच मागे ठेवला नव्हता. तरीही पोलिसांनी गुन्हेगारांचा माग काढला.

रामदास आठवले यांनी नवभारत टाइम्स ऑनलाईन सोबत बोलताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत. त्याशिवाय 10 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. आम्हाला आणखी 30 आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. लवकरच ते आमच्या सोबत येतील. आता शिवसेनेला निश्चित करायचे आहे की, भाजप सोबत यायचे आहे की, आणखी काय करायचे आहे. आमच्याकडून शिवसेनेला नेहमीच आमंत्रण आहे. सोबत येऊ सरकारस्थापन करु. जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन करु. त्यासाठी संसदेच्या अधिवेशन काळात शिवसेना नेत्यासोबत चर्चा करु असे, आठवले यांनी या वेळी सांगितले.