PM Modi (PC - ANI)

PM Modi to Visit Brunei and Singapore: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)दोन दिवसांच्या ब्रुनेई दारुस्सलाम आणि सिंगापूर दौऱ्यावर आहेत. या राष्ट्रांचे भारतासोबत असलेले चांगले संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी ब्रुनेई दारुस्सलाम (Brunei Darussalam)आणि सिंगापूरला (Singapore)भेट देणार आहेत. 'भारत-ब्रुनेई दारुस्सलाम राष्ट्रामधील राजनैतिक संबंधांना 40 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मी हाजी हसनल बोलकिया यांना भेटण्यास उत्सुक आहे. सिंगापूरमध्ये राष्ट्राध्यक्ष थर्मन षणमुगररत्नम, पंतप्रधान लॉरेन्स वोंग, वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग आणि एमेरिटस वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची ङेट घेणार आहे. महत्त्वाचे क्षेत्र अधिक दृढ करण्यास उत्सुक आहोत.', असे ट्वीट पंतप्धान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. (हेही वाचा:BJP Membership Drive: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपच्या राष्ट्रव्यापी सदस्यत्व मोहिमेची सुरुवात; प्राथमिक सदस्य म्हणून केली नावनोंदणी )

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ते 4 सप्टेंबर या कालावधीत ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी प्रथमच ब्रुनेईला जाणार आहेत. ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी या देशांना भेट देत आहेत. या भेटींमुळे भारताचे दोन्ही देशांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधानांचा दौरा विशेषत: भारतीय प्रवासी समुदायाच्या हितावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय सिंगापूरसोबत मुक्त व्यापार कराराबाबत सामंजस्य करारही होणे अपेक्षित आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदींच्या ब्रुनेई भेटीसंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.

ब्रुनेई आणि सिंगापूरचे  भारतासोबत संबंध  दृढ करण्यावर भर

सेमीकंडक्टर: भारत ब्रुनेईसोबत सेमीकंडक्टर क्षेत्रात सहकार्य वाढवण्याची शक्यता आहे.

हायड्रोकार्बन आणि नैसर्गिक वायू आयात: भारत ब्रुनेईकडून हायड्रोकार्बन आयात करून नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पंतप्रधान या विषयावर विशेष चर्चा करणार आहेत.

म्यानमारमधील परिस्थिती: म्यानमारमधील परिस्थितीवर सुलतान हसनल बोलकिया यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे.

द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक: भारताने ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन क्षेत्रात $270 दशलक्षची गुंतवणूक केली आहे आणि नैसर्गिक वायूच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही गुंतवणूक आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे.

सिंगापूर दौरा

4-5 सप्टेंबर काळात पंतप्रधान मोदी सिंगापूर दौऱ्यावर असणार आहेत. भेटीदरम्यान भारत आणि सिंगापूर यांच्यातील मुक्त व्यापार कराराव (FTA) चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय आणखी काही करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय, चीनसंदर्भातील प्रादेशिक तणावाच्या अनेक मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते.