संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता, सरकारकडून नितेश राणेंना अडकवण्याचं षडयंत्र- नारायण राणे
Nitesh Rane (Photo Credits: PTI)

कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab Attack) यांच्यावर हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपली प्रतिक्रिया दिली आहे.  महाविकासअघाडी (MVA) कडून या प्रकरणात नितेश राणे यांना अटकवले जात आहे. कणकवली येथील एका कार्यकर्त्यांच्या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करीत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच सत्तेचा गैरवापर सूडबुद्धीने केला जात असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे पुढे म्हणतात, पोलिसांनी लक्षात ठेवा केंद्रामध्ये पण आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलीस वागत असतील तर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. राणेच्या या वक्तव्यावर शिवसेना आणि भाजप (Shivsena & BJP) पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे

नितेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. (हे ही वाचा Maharashtra Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक आज किंवा उद्या पार पडण्याची शक्यता, भाजपकडून आमदारांना व्हीप जारी.)

नितेश राणे यांची प्रतिक्रिया 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत मतदारामध्ये आणि आमच्या मध्ये उत्साहच वातावरण दिसत आहे. आणि या सगळ्या गोष्टी बघुन महाविकासअघाडी मला संतोष परब या प्रकरणात गुंतवत आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासुन हे सरकार विरोधी पक्षाच्या सगळ्याच नेत्यानां कोणत्यान कोणत्या चुकीच्या केस मध्ये अडकवुन हे सरकार असा कारभार करत आहे आणि तोच अनुभव मला सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत येतो आहे. असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Tweet

काय आहे प्रकरण

संतोष परब यांच्यावर 18 डिंसेबरला कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.