नवी दिल्ली: महिला भाजपा (BJP) कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Sanjay Raut) यांच्याविरोधात नवी दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहे. शिवसेना खासदार संजय राउत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन आयपीसीच्या कलम 509 आणि 500 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar) यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संतापून संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अपशब्द वापरला होता. त्यावरूनच दीप्ती रावत (Deepti Rawat) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संविधानिक पदावर असतानाही असभ्य भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
राजकीय हेतुने माझा आवाज दाबण्याच प्रयत्न - संजय राऊत
महिला भाजपा कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तो राजकीय हेतूने आणि माझा आवाज दाबण्यासाठी करण्यात आला आहे. माझ्या विरोधात सीबीआय, आयटी, ईडी वापरता येणार नाही म्हणून माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हे केले गेले आहे. मी खासदार आहे, काहींना माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करण्यासाठी प्रोत्साहित करणे योग्य नाही असे संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
Tweet
FIR registered against me in Delhi has been done with political motives & to suppress my voice. It has been done to defame my party as CBI, I-T, ED can't be used against me. I'm an MP, it's not right to encourage some to register false complaints against me: Sanjay Raut, ShivSena pic.twitter.com/eNR3bf5Egb
— ANI (@ANI) December 13, 2021
काय आहे प्रकरण
नवी दिल्लीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिल्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोवरुन काही लोकांनी संजय राऊतांवर टोलेबाजी केली होती. यावर संजय राऊतांनी संतापही व्यक्त केला, आणि बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, लालकृष्ण अडवाणी जरी असते तरी मी खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून विकृती आहे, अशा शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी टीका करणारांबाबत अपशब्द देखील वापरले होते. (हे ही वाचा Jitendra Awhad On Sanjay Raut & Sharad Pawar Viral Photo: संजय राऊतांना जितेंद्र आव्हाडांकडून नमन, पवारांना खूर्ची नेऊन दिल्याने राऊतांवर टीका करणाऱ्यांवर आव्हाड संतापले.)
तसेच प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरें यांचे संस्कार आहे तेच आमचे गुरु आहे. मोठ्या मांणसाचा आदर करावा हे आम्हाला शिकवल आहे. आणि हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही राज्यात कधीच सरकार स्थापन करु शकणार नाही. तुमच्या डोक्यातील कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. असे राऊत म्हणाले होते. परंतु, आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी अपशब्द वारले अशी तक्रार दीप्ती रावत यांनी केली आहे.
काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांची भाजपवर टिका
भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नवी दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सांवत यांनी भाजपवर टीका केली आहे.
Tweet
आश्चर्य आहे! @rautsanjay61 यांच्यावर #भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै.श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे. pic.twitter.com/18s8Z7ZV06
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 12, 2021
महिलांनी गुन्हा दाखल केला का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै.श्रीपाद जोशी यांच्या 1957 पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे.