राज ठाकरे (Image Source: Facebook Page)

भारताची गान कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना सोमवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे ब्रीच कॅंडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले. लता मंगेशकर या वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली आहेत. तसेच लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आधीच्या तुलनेत बरीच सुधारणा झाली असल्याची माहिती समोर आली आहे . यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी ट्विटरच्या माध्यमातून दीदी तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार, अशी पोस्ट केली होती. त्यानंतर राजठाकरे यांनी आज त्यांच्या पत्नीसह आज ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.

लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी बातमी कानावर पडताच त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. यातच लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळताच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली आहे. गुरुवारी राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली होती. दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचे बळ इतके मोठे आहे की, या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतो, अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी केले होते. हे देखील वाचा- आज बाळासाहेब असायला हवे होते! अयोध्या निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

एएनआयचे ट्वीट-

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदी यांच्या छातीत दुखू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली असून त्या आता स्थिर आहेत.