Balasaheb Thackeray, Raj Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अयोध्या प्रकरणावर (, Ayodhya Land Dispute) सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय ऐकायला आज बाळासाहेब (Balasaheb Thackeray) असायला हवे होते. ते जर आज असते तर त्यांना प्रचंड आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, न्यायालयाने समाधानकारक निर्णय दिला.

राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केले त्यांच आज सार्थक झालं. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना  आणि  वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो आज निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. (हेही वाचा, Ayodhya Judgement: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर मात्र आम्हांला अपेक्षित निकाल आला नाही: मुस्लिम पक्षकार)

राज ठाकरे ट्विट

आता लवकरात लवकर राममंदिराची अभारणी व्हायला हवी आणि 'रामराज्य' देखील यायला हवं. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता, असेही राज ठाकरे म्हणाले.