Maharashtra Government Formation Live Streaming: राज्यात वेगाने बदलत आहेत घडामोडी; येथे पाहा क्षणोक्षणीचे अपडेट
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2019 Live News Update | (Photo Credits-File Image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटून गेला तरी सत्तास्थापनेचा तिढा काही सुटत नव्हता. कोण मुख्यमंत्री होणार या प्रश्नावर पडदा टाकत देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या स्फोटाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण दिले. त्यानंतर कदाचित स्थिर सरकार येईल अशी अपेक्षा होती मात्र तसे काही न होता उलट हा तिढा अजूनच चिघळत चालला आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यापाल कोश्यारी यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी 10.30 वाजता दुसऱ्यांदा सुनावणी घेण्यात आली. मात्र याचा निकाल ही उद्या सकाळी 10.30 वाजता लागणार आहे.

या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी TV9 Marathi या लिंकवर Live Streaming पाहू शकता.

तसेच ABP Majha या लिंक वर तुम्ही महाराष्ट्रातील राजकारणाच्या घडामोडीचे Live Streaming पाहू शकता.

आज, राज्यपालांच्या समर्थनार्थ तुषार मेहता यांच्याकडून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या संमतीचे तर भाजपच्या 105 आमदारांच्या समर्थनाचे पत्र कोर्टात सादर करण्यात आले.22 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी गटनेते पदाच्या अधिकारातून 54 म्हणजेच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सहीचे पत्र भाजपकडे सोपवल्याचे समोर आले तर त्याआधी भाजपाने आपल्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिले हे ही समोर आले. राष्ट्रवादी आणि भाजपा मिळून 170 आमदारांची संमती घेऊनच देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्याचे स्पष्ट आले आहे.

हेदेखील वाचा- अजित पवार - शरद पवार यांच्या राजकीय खेळीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं मजेशीर ट्वीट

तर फ्लोर टेस्ट मध्ये सरकारला बहुमत सिद्ध करता न आल्यास आपली बाजू समोर मांडण्यासाठी शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसकडून एकत्रित प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आले होते मात्र कोर्टाने हे पत्र याचिका कक्षाच्या बाहेर आहे असे सांगत स्वीकारण्यास नकार दिला आहे.