शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena) यांनी आज दादरच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांसमवेत त्यांनी शपथ घेतली. या सहा मंत्रांपैकी एक मुख्य नाव म्हणजे ठाणे शहराचे पालक मंत्री राहिलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde). 55 वर्षीय एकनाथ शिंदे हे ठाणे, महाराष्ट्रातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पीडब्ल्यूडी (PWD) कॅबिनेट मंत्री म्हणून शिंदेंची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते शिंदेंचे नाव काही दिवसांपूर्वीपर्यंत मुख्यमंत्री होण्याच्या यादीत होते. ते मुंबईच्या रस्त्यावर एकेकाळी ऑटो चालवत असत आणि नंतर बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन शिवसेनेत रुजू झाले. शिंदेंनी जमीनी पातळीवरुन राजकारणाची सुरूवात करून राजकारणाची सुरुवात केली. ठाणे आणि आसपासच्या भागात शिवसेने आज बळकट स्थानावर पोहचवण्याचे श्रेय शींदेंना जाते.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगरी जावली तालुक्यातील आहेत. ठाणे शहरात आल्यानंतर त्यांनी 11 वी पर्यंत ठाण्यातील मंगला हायस्कूल आणि जुनिअर कॉलेजमधून अकरावीपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर उपजीविकेसाठी त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. एकनाथ हे ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील रहिवासी आहेत. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेत येईपर्यंत शिंदेंना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेतेपद भूषवण्याची संधी मिळाली होती. शिंदे हे जनसमर्थन असणारे नेता आहे. असे मानले जाते की उद्धव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काही पाऊल उचलले तर ते भविष्यातील नारायण राणे असल्याचे सिद्ध होऊ शकेल.
शिंदे हे एक मितभाषी आणि विनम्र व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. स्वत: बोलण्यापेक्षा आपल्या कामातून बोलणारे ठाण्याचे लोकप्रिय शिवसेना आमदार अशी त्यांची ओळख आहे. दहावी पास शिंदे यांची जवळपास 11.5 कोटींची मालमत्ता असून त्यांच्यावर 18 खटले दाखल आहेत. शिंदे कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून 2004, 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी निवडून येण्यापूर्वी दोन-मुदतीच्या कालावधीसाठी ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. याव्यतिरिक्त, ते तीन वर्षे शक्तिशाली स्थायी समितीचे सदस्य होते. दरम्यान, शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे हाही कल्याण मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून लोकसभेत पोहोचला आहेत.
मुंबई जवळच्या ठाणे (Thane) जिल्ह्यात शिंदे हे एक वजनदार नाव आहे. त्यांचा या जिल्ह्यातील प्रभाव असा आहे की लोकसभा निवडणुका असो की स्थानिक निवडणुका नेहमीच त्यांचा उमेदवारच विजयी होतो.