कोरेगाव भीमा (Bhima Koregaon) येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. यानिमित्ताने आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. तसेच कोणी अफवा पसरवू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये , असे आवाहन अजित पवार यांनी सर्व जनतेला केले. दरम्यान, आज भीमा कोरेगाव येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी कोरेगाव भीमा येथे मोठे नेते, कलाकार, येत असतात. यामध्ये नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचाही समावेश आहे. आजचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होत आहे. यावेळी नेतेमंडळींसह आमदार आणि खासदार सुद्धा दिवसभर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी या दिवशी अभिवादन सोहळ्यामध्ये अनुचित प्रकार घडला होता. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवर्जून सांगितले आहे. हे देखील वाचा-कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळला जनसागर; अजित पवार, प्रकाश आंबेडकर यांनी घेतले दर्शन
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar paid tributes at 'Jay Stambh' near Pune on 202nd anniversary of Bhima Koregaon battle, earlier today. pic.twitter.com/UFl04QlVCk
— ANI (@ANI) January 1, 2020
1 जानेवारी 2018 मध्ये जो अनुचित प्रकार घडला होता. हाच प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पोलिसांची मोठी कुमक तैन्यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट पसरवणाऱ्यांवर देखील पोलिसांचे लक्ष आहे. सोशल मीडियावरून असे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी 250 हून अधिक व्हॉटसअॅप ग्रुपच्या अॅडमिनला याआधीच नोटिस बजावण्यात आली आहे.