Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवत राजभवनावर जाऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister ) पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी प्रथमच ट्विट (Twitter) करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटच्या माध्यमातून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, पियुष गोयल यांच्यासह विविध भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांना टॅग करत आभार मानले आहे. राज्याला स्थिर सरकार देण्याबाबत आपण पंतप्रधान मोदी यांना शब्द दिल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या बंडाची किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा प्रसारमाध्यमं यांना कानोकानी खबरही नव्हती. प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त प्रसारित झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. या घटनेनंतर अजित पवार यांची समजूत काढणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत बोलावणे याबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या. त्यातील काही आमदार राष्ट्रवादीला हाताशी लागले. मात्र, अजित पवार यांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही.

अजित पवार ट्विट

अजित पवार ट्विट

अजित पवार ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार ठेवण्यात आलेल्या हॉलेल रेनसॉ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी या आमदारांची भेट घेतली. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची भेट घेतली.