Loksabha Elections2019: लोकसभा निवडणुकीचा निकाल आता ट्रॅफिक साईनबोर्डवर पाहता येणार? निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम
Traffic Display Sign-Board. Representative Image. (Photo Credits: Wikimedia Commons)

Mumabai Traffic Signboards To Display Loksabha Elections Results: लोकसभा निवडणुकांची (loksabha elections) लढत आता शेवटच्या टप्प्यात आली असून नेमका निकाल काय लागणार याबद्द्ल उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 23 मे ला जाहीर होणारा निकाल (Election Results) सगळ्यांना पाहता यावा यासाठी निवडणूक आयोगाने (election Commission)  एक वेगळीच शक्कल लढवण्याचे ठरवले आहे. कामानिमित्त प्रवासात असणाऱ्या मुंबईकरांना चक्क ट्रॅफिक सिग्नल (Traffic Signal) वरील साईनबोर्डवर (Signboard) निकाल पाहता येईल असे सूत्रांकडून समजतेय. निकालाच्या दिवशी ट्रॅफिक साईनबोर्ड वर अपटुडेट माहिती देण्यासाठी सध्या निवडणूक आयोगाचे प्रयत्न चालू आहेत.

यासंदर्भात प्रस्ताव मांडणारे पत्रक देखील महाराष्ट्र राज्यातील आयोगाच्या अधिकाऱ्यांतर्फे तयार करण्यात आले आहे. अनेकदा प्रवासादरम्यान नेटवर्कच्या समस्यांमुळे मोबाईल किंवा लॅपटॉपचा शून्य वापर करता येतो, अशा प्रवासात अडकलेल्यांना निकालाची माहिती मिळावी हा या उपक्रमाचा मुख्य आणि एकमेव हेतू असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. टाइम्सच्या माहितीनुसार महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी अश्विनी कुमार (Ashwini Kumar)  यांनी अन्य प्रमुख अधिकाऱ्यांची मीटिंग घेत या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी काय तरतूद करता येईल तसेच यातील समस्यांविषयी चर्चा केली. त्यानुसार आता योग्य अशी व्यवस्था करण्यात येणार असून हे सर्व साईनबोर्डस थेट मंत्रालयासही जोडले जातील.

यंदा व्हीव्हीपॅट्सच्या मोजणीला वेळ लागणार असल्याने निकालात उशीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱयांनी टाइम्सशी बोलताना दिली आहे. प्रत्येक मतदारसंघातून निदान पाच केंद्रांवर व्हीव्हीपॅट्सच्या स्लिप्सची मोजणी करण्यात येईल. Lok Sabha Election Results 2019: 23 मे ला 'गडचिरोली' लोकसभा निवडणूक निकाल सर्वप्रथम लागण्याची शक्यता, 1 वाजेपर्यंत निकाल येणार हाती

यंदा 11 एप्रिल ते मे 19 या कालावधीत देशभरातील सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणूकांचा निकाल 23 मे ला जाहीर होणार आहे.