Lok Sabha Elections 2019 Forth Phase Voting | (Photo Credits: ANI/Twitter)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 च्या मतमोजणीस सुरुवात झाली असून, काही जागांवरील प्राथमिक आकडेवारी प्राथिनिधिक स्वरुपता पुढे येताना दिसत आहे. देशभरातील काही जागांचा विचार करता महाराष्ट्रात काँग्रेस 3 तर भाजपही 3 ठिकाणी आघाडीवर आहे. तर, देशाचा विचार करता देशात भाजप 51 तर काँग्रेस 19 जागांमध्ये आघाडीवर आहे.

प्राप्त माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील चिक्कोडी मतदारसंघातून भाजप आघाडीवर आहे. चिक्कोडी हा मतदारसंघ काँग्रेस प्रभावी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तर, दुसऱ्या बाजूला दक्षिण कन्नड मतदारसंघातून काँग्रेस आघाडीवर आहे. हा मतदारसंघ हा भाजप प्रभावीत मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. (हेही वाचा, महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; जाणून घ्या लेस्टेस्ट अपडेट्स)

महत्त्वाचे असे की, महाराष्ट्र आणि देशभरातील विविध मतदारसंघातून येणारी आकडेवारी ही प्रातिनिधिक आहे. ती सतत बदलणारी असते. अखेरचा निकाल हाती येईपर्यंत कोणत्याही जागेबद्दलचा स्पष्ट अंदाज बांधता येत नाही. वेळोवेळी येणारी आकडेवारी आणि निकाल आपल्याला आम्ही सतत सांगत राहणार आहोत.