Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक निकाल 2019, काऊंटडाऊन सुरु, आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात
Lok Sabha Elections 2019 Results to be out today (Photo Credits: File Image)

Lok Sabha Election Results 2019: जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील उत्सव म्हणून ओळखली जाणारी लोकसभा निवडणूक 2019 या वेळी सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरली होती. या निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत निवडणूक पार पडली. या निवडणूक प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणजे मतमोजणी. हा टप्पा आज पार पडतो आहे. आज (गुरुवार, 23 मे 2019) सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी लोकसभा निवडणूक प्रणाली आणि एकूण कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार, संपूर्ण देशभरात एकूण 7 टप्प्यांत ही निवडणूक पार पडली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघात निवडणूक पार पडली. दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघात, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघात, तर चौथ्या टप्प्यात टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघात, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांतील 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात व सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात आठ राज्यातील 59 मतदासंघात मतदान पार पडले. महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार चार टप्प्यात पार पडले. लोकसभा निवडणूक मतदानर पार पडल्यावर आज म्हणजेच 23 मे रोजी मतमोजणी पार पडत आहे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकाल काय लागतो याकडे राजकीय पक्षांसोबतच सर्वसामान्य जनतेलाही प्रचंड उत्सुकता आहे.