Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये सध्या लोकसभा निवडणूक 2019 (lok Sabha Elections) चा प्रचार रंगात आला आहे. अशामध्ये आचर संहितेचा भंग होऊ नये यासाठी निवडणूक आयोगही (Election Commission) सज्ज आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक (Modi Biopic) नंतर त्यांच्या जीवनावर आधारित इरॉस नाऊ (Eros Now) च्या  Modi: The Journey of a Common Man वेब सीरीजचे (Web Series) प्रक्षेपण थांबवण्याचे आणि पूर्वीचे व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय लागू राहील असे सांगण्यात आले आहे.

ANI Tweet: 

Modi: The Journey of a Common Man या वेब सीरीजमध्ये नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून त्यांचे तारूण्य, राजकीय कारकीर्द आणि पंतप्रधानपदाचा शपथसोहळा दाखवण्यात आला आहे. मिहिर भुता आणि राधिका आनंद यां नी या वेब सीरिजचे लेखन केले आहे. तर Oh My God फेम दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले आहे. महेश ठाकूर,  आशिष शर्मा यांनी नरेंद्र मोदींची भुमिका साकारली आहे. पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकसाठी निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय, चित्रपट प्रदर्शित करण्यावर स्थगिती

देशात सत्तेतील विरोधकांकडून पीएम मोदी चित्रपट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रदर्शित करु नये अशी मागणी केली होती. तसेच काँग्रेस पक्षानेसुद्धा निवडणुक आयोगकडे चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखेवरुन धाव घेत याचिकासुद्धा दाखल केली होती.