'आधी लग्न होईल, नंतर पाहू मुलगा होईल का मुलगी'- असदुद्दीन ओवेसी
AIMIM Chief Asaduddin Owaisi (Photo Credits; IANS/ File)

सत्तास्थापनेसाठी भाजपने-शिवसेना (BJP-ShivSena) पक्षाला नकार दिल्यापासून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. तसेच कोणत्या पक्षाचा झेंडा महाराष्ट्रात (Maharshtra) फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी सध्या सरु असलेल्या राजकीय घडामोडींवरून महायुतीवर निशाणा साधला आहे. "नेहमी आमच्या पक्षावर आरोप करण्यात आला. आम्ही मत कापण्यासाठी निवडणुका लढतो, मात्र लोकांना कळाले की, कोण मत कापत आहे?" असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सोमवारी सायंकाळी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला, पण मुदतीत काँग्रेसकडून पत्रच प्राप्त झाले नाही. पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये झालेल्या घोळाचा शिवसेनेला फटका बसला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 2 आठवडे झाले असून अजूनही राज्यात सत्तापेच कायम आहे. भाजप-शिवसेना महायुतीला या निवडणुकीत अधिक जागा मिळाल्या असून मुख्यमंदीपदावरुन वाद निर्माण झाला होता. शेवटी भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पेटले. यावरुनच ओवैसी यांनी राजकीय घडामोडींवरुन महायुतीवर निशाला साधला आहे. एआयएमआयएम पक्षावर मत कापत असल्याचे आरोप होत असतो, असे त्यांच्या भाषणातून नेहमी बोलत असतात. परंतु, सध्याची राजकीय परिस्थितीवरुन लोकांना कळाले की, कोण मत कापत आहे? असेही असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत. हे देखील वाचा-महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

एएमआयएन ट्विट-

शिवसेना आणि भाजपमधील 30 वर्ष जुनी युती सोमवारी फुटली. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने एनडीएबरोबर मतभेद केल्यास शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. यानंतर मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला, त्यामुळे युती तुटली अशी माहिती समोर आली आहे.