मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवरील (shivaji Park) गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार टीका केली. "महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, दोन नंबरचा पक्ष शिवसेना आणि तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी, असं असताना तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारांसोबतच देशाच्या राजकारणात असा प्रकार पाहिला नाही," असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. सरकारवर केलेल्या टिकेवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज ठाकरे जे बोलत आहे ते सत्यच आहे. यवतमाळ इथे शनिवारी आमदार मदन येरावार यांच्याकडे आले असता देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य केलं.
महाराष्ट्रात क्रमांक एकचा भाजप पक्ष सत्तेच्या बाहेर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परंतु राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण न ऐकल्याने जास्त बोलणं योग्य नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (हे देखील वाचा: 'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरु झाले जातीचे राजकारण'; राज ठाकरे यांनी केले जनतेला संबोधित, जाणून घ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे)
शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली
2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल आठवण करून राज ठाकरें म्हणाले, ‘त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या विरुद्ध उभी होती. निवडणुकीआधी राज्यात भाजपच्या अनेक सभा झाल्या परंतु अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काही चर्चा झाली नव्हती. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यावर आपल्यामुळे सरकार अडतंय हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले. त्यानंतर राज्याचे राजकारण बदलले. लोकांनी भाजप-शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते मात्र शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली.’