'महाराष्ट्राला लवकरच पर्यायी सरकार मिळणार'- नबाब मलिक
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना यांना अधिक जागा मिळाल्या तरी देखील मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी बाकावर बसणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर राज्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच राष्ट्रवादी ( National Congress Party) आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सत्तास्थापनेसंदर्भात वक्यव्य करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात सत्तास्थापनेबाबतीत बैठक पार पडणार आहे. यानंतर लवकरच महाराष्ट्राला पर्याची सरकार मिळेल असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरी देखील राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष अपयशी ठरले आहे. भाजपने सत्तास्थापनेपबाबतीत असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, सोनिया गांधीचा याला नकार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी पक्षावर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. यावर नवाब मलिक म्हणाले की, आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर सत्तेस्थापनेबाबत निर्णय घेण्यात आल्यानंतर लवकरच महाराष्ट्राला पर्यायी सरकार मिळेल, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. हे देखील वाचा- #Confirmed: शिवसेना NDA मधून बाहेर! लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षासोबत बसणार - प्रल्हाद जोशी

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. जर काँग्रेस पक्षाने शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा दिला तर, याचा परिणाम इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीवर पडेल, अशी शक्यता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.