Anil Mahajan Letter To Devendra Fadnavis:  अजूनही वेळ गेली नाही, एकनाथ खडसे यांना सोबत घ्या! भाजप कार्यकर्ता अनिल महाजन यांचे देवेंद्र फडणीस यांना पत्र
Anil Mahajan | File Photo

भाजपमधील एका कार्यकर्त्याने विधानसभेतील विरधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रात भाजपमधील ओबीसी (OBC) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सोबत घेण्याचा सल्ला दिला आहे. अनिल महाजन (Anil Mahajan) असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. शिवसेनेसोबत युती करुन चुक केली. अन्यथा विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपला 150 जागा मिळाल्या असत्या असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे. हाच धागा पकडत 'उशिरा का होईना आपण ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांचे म्हणने मान्य केले' असा टोलाही महाजन यांनी आपल्या पत्रात लगावला आहे.

अनिल महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, फडणवीस साहेब अजून ही वेळ गेलेली नाही. एकनाथ खडसे अनुभवी दिगग्ज हाडमासाचे सामान्य कार्यकर्त्यांचे नेते आहेत. तुम्ही (फडणवीस) अल्पसंख्यांक,एकनाथ खडसे साहेब अल्पसंख्याक आहेत. आपणच एक दुसऱ्याला सांभाळे पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री झालात ते तुमच्या नशिबात होते. ते आपल्या कडून कोणीही हिसकाऊ शकत नाही. होते सर्व गोष्टी ह्या नशिबावर अवलंबून असतात. पुढे रस्ता खूप कठीण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.

महाजन यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांची सामान्य कार्यकर्त्या सोबत नाळ जुडली आहे. त्यांची नाराजी दूर करा त्यांना न्याय द्या. ते पक्षाशी प्रामाणिक आहेत, अशी माझ्या सह असंख्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. महाजन यांनी फडणवीस यांना उद्देशून पत्रात पुढे म्हटले आहे की, आपण कालच म्हटले मी ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून काही प्रस्थापित लोक मला टार्गेट करत आहेत. जेव्हा एकनाथ खडसे साहेबाना ओबीसी समाजाचा नेता आहे म्हणून आपल्याच स्वपक्षीय काही लोकांन कडून ओबीसी आहे म्हणून वेगवेगळ्या छुप्या मार्गाने टार्गेट केले गेले तेव्हा आपण त्या लोकांना का? बोलले नाहीत? खडसे यांच्या पाठीशी आपण उभे का? राहिले नाही? असा सवाल उपस्थित करत, जशा वेदना आता आपल्याला होत आहेत तशाच एकनाथ खडसे यांनाही होत आहेत. असे म्हणत आपण जे पेरणार तेच उगणार आहे, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत रंगल्याचेही या कार्यकर्त्याने म्हटले आहे.