Arvind Sawant | Photo Credits: ANI)

मुंबई: कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, त्याचे पडसाद राज्यात सगळीकडे पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर (Arvind Sawant On BJP) निशाणा साधत त्याच्यांवर टीका केली आहे, तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नंरेद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप (BJP Leaders) नेते गप्प का असा सवाल ही अरंविद सांवत यांनी केला आहे. कर्नाटक घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेने आज आंदोलन केले. या आंदोलनावेळी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

कर्नाटकात भाजपा सरकार असतानाही देशाच्या देवांचा अपमान होतो पण कोणतीच कारवाई होत नाही. या घटनेवर चंपा असो वा दंफा कोणीच बोलत नाहीत. कानडी बांधवांनो तुम्ही महाराष्ट्रात राहतात. येथे तुम्हाला त्रास होत नाही, शाळा बंद केल्या जात नाही. तुम्ही तुमच्या सरकारला समजवा अन्यथा महाराष्ट्रात राहणे कठीण होईल, असा धमकी वजा इशारा सावंत यांनी दिला आहे. एवढंच नाही तर आम्ही सत्व आणि तत्व सोडलेलं नाही. आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर यायला लावू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे धगधगता अग्नी आहेत. त्यांचा अवमान झाल्यानंतर सगळ्यांची बोबडी वळली आहे असाही टोला सावंत यांनी लगावला आहे. (हे ही वाचा Gulabrao Patil Statement: रस्त्यांची तुलना मंत्री गुलाबराव पाटीलांनी केली भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी, वक्तव्यावर भाजप आक्रमक.)

पंतप्रधानांनी काशीतील कार्यक्रमावेळी शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख केला, त्यामुळे आधी बोम्मईचा राजीनामा घ्या आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असल्याचे दाखवा. महाराजांचा अपमान करणाऱ्या बोम्मईंचा राजीनामा घेण्याचे मागणी पत्र घराघरातून पाठवा, पेठून उठा हीच शिवसेनेची शिकवण आहे. असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री बोम्मई यांचे आक्षेपार्ह विधान

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, "शुक्रवारी रात्री बंगळुरु येथे घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. अशा लहान सहान गोष्टीवरून दगडफेक करणे, सरकारी वाहनांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही प्रवृत्ती चांगली नव्हे. बोम्माई यांच्या या विधानावरुन शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध बेळगाव, कोल्हापूर आणि सीमाभागातून केला जात आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेकडून या घटनेचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.