Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

बहुजन समाज पार्टी (Bahujan Samaj Party) प्रदेश महासचिव अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आहे. महाजन यांच्या राजिनाम्यामुळे  महाराष्ट्र बसपाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान,  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आज सकाळी अनिल महाजन यांनी शिवनेरी बंगल्यावर घेतली भेट. गिरीश भाऊनी अनिल महाजन यांना कामाला लागण्याचे  संकेत दिले. अनिल महाजन यांची माळी समाज तसेच ओबीसी (OBC) समाजाचे नेते अशी ओळख आहे. माळी-ओबीसी समाजाच्या विविध मागण्यां पूर्ण होण्यासाठी हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत सूत्राकडून मिळाले आहेत. दरम्यान, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिल महाजन हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महाजन यांची राज्यात ओबीसी-बहुजन नेते म्हणून ओळख आहे. महाराष्ट्र माळी समाज महासंघ या राज्यव्यापी संघटनेचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत. तसेच त्याचे राज्यभर उत्तम समाज संघटनही आहे. त्यामुळे या संघटन कौशल्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. प्रत्येक मतदार संघात माळी समाज हा निर्णयाकारक आहे. भाजपा सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे अनिल महाजन यांची पुन्हा भाजपा मध्ये घरवापसी होऊ शकते. माळी समाजासह ओबीसींचे खूप मोठे संघटन राज्यभरात अनिल महाजन यांनी केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन भाजप नेते यांना पुन्हा भाजपा मध्ये प्रवेश देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, अनिल महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे व महाराष्ट्र प्रभारी राज्यसभा खासदार अशोकजी सिद्धार्थ यांना ईमेल द्वारे राजीनामा पाठवला आहे. तर, बहुजन समाज पार्टी प्रदेश कार्यालय येथे पोस्टाने राजीनामा पाठवला आहे.