ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले आहे. पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोरोना आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीपूर्वी नानां पाटेकर यांनी अजितदादांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार कधीही आपल्या कामाची जाहिरात करत नाहीत, असेही अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शांत राहून आपले काम करतात. काही चुकलं तर ते अधोरेखित करतात. ते खरेच चांगले नेते असून त्यांचे कार्य लोकांसमोर येण्याची गरज असल्याचेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.
पुढे म्हणतात, पाच वर्षे पक्ष बदललेल्या व्यक्तीला कोणतेही पद देऊ नका. म्हणजेच कोणतीही नेता पक्ष बदलणार नाही. पक्ष बदलण्यासाठी काही नियम असावेत. किमान शिक्षणाची अट पाहिजे, असे नाना पाटेकर यांनी अधोरेखित केले आहे. तसेच आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. मात्र, राजकारण्यांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. (हे ही वाचा Maharashtra: रणजित डिसले गुरुजींना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून त्रास, नोकरी सोडण्याचा विचार)
अमोल कोल्हे यांची पाठराखण
विशेषतः नाना पाटेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. “अमोल कोल्हे एक अभिनेता आहे, त्याने कोणती भूमिका करायची हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी 30 वर्षांपूर्वी नथुराम गोडसेची भूमिकाही केली होती. मी भूमिका केली त्यामुळे मी त्याला सपोर्ट करत नाही. गोडसेची भूमिका मी का केली, हेच माझ्या उदरनिर्वाहाचे साधन आहे, मला काय अडचण आहे? असा सवाल करत नाना पाटेकर म्हणाले.
प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळले पाहिजे
दरम्यान, नाना पाटेकर यांनीही कोरोनावर आपले मत मांडले. “प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. कोरोनाने सर्वांना जमिनीवर आणले. कोविडच्या काळात नाती समजली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे.