
CM Eknath Shinde Delhi Visit: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. अचानक त्यांनी काल दहाच्या सुमारास मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दिल्ली (Delhi) तिथे जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रीचा हा नियोजित दौरा नसल्यामुळे त्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. राजकिय वर्तुळात आता या संदर्भात चर्चा रंगली आहे. विधीमंडळात पावसाळी अधिवेशन चालू आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली का गाठली हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात असलं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची (BJP Leaders) भेट घेणार आहेत.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेवून त्यांच्या सोबत राज्यभरातील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहे. या आधी एकनाथ शिंदे 18 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठक घेतली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतील अशी शक्यता दिसून येत आहे. राज्यभरात राजकिय घडामोडीचा वेग वाढलेला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भेटीतून एखादा राज्यासाठी मोठा निर्णय होऊ शकते. आज भाजपश्रेष्ठींची भेटी घेतील आणि महत्त्वाच्या चर्चा देखील करणार. मुख्यमंत्री पदावरुन आधीच रस्सीखेच चालू असताना मुख्यमंत्री दिल्लीत रवाना झाले आहे.
एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी सहकुटुंब रवाना झाले आहेत. म्हणून त्यांच्या या दौऱ्यामागचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळालं.या बैठकीत नेमकं कोणती चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर अंतिम निर्णय होतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.