Mumbai-Goa Vande Bharat Express: गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान 3 जून रोजी दाखवणार हिरवा झेंडा; मुंबई ते गोवा प्रवासाला लागणार फक्त साडेसात तास
Vande Bharat Express, Pm Modi (PC - Twitter,facebook)

Mumbai-Goa Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 3 जून रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील. पंतप्रधानांच्या 'मेक इन इंडिया' आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील 19वी वंदे भारत रेल्वे असेल.

ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वेगाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासाची बचत होईल. (हेही वाचा - FIR Against Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात 2 एफआयआर दाखल; कुस्तीपटूंनी WFI प्रमुखाविरोधात केलेल्या 10 तक्रारींचा तपशील उघड)

स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.