Independence Day 2020: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावेळी मेजर श्वेता पांडे करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रीय ध्वज फडकायला मदत
Red Fort (Photo Credits: ANI)

Independence Day 2020: लाल किल्ल्यावरील 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रीय ध्वज फडकायला मदत करण्यासाठी एक महिला सैन्य अधिकारी मदत करणार आहे. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. मेजर श्वेता पांडे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.

कोरोना संकटामुळे यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यंदा पंतप्रधानांना ध्वजारोहणासाठी मदत करण्याचा मान मेजर श्वेता पांडे यांना मिळाला आहे. (हेही वाचा - Independence Day 2020: भारताच्या विषयी 'या' गोष्टी अगदी मोजक्या लोकांंना आहेत ठाउक, स्वातंत्र्य दिनी तपासुन पाहा तुमचंं ज्ञान)

विशेष म्हणजे मेजर पांडे यांनी यापूर्वी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या भव्य परेडमध्ये भारतीय पथकाचं नेतृत्व केलं होतं. या परेडमध्ये श्वेता यांनी भारताचा राष्ट्रध्वज घेऊन नेतृत्व केलं होतं. या कार्यक्रमास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. 2012 मध्ये त्यांनी लष्करात प्रवेश केला होता.

मॉस्कोच्या लाल चौकातील परेड ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा 15 ऑगस्टचा मुख्य कार्यक्रम हा त्यांच्या आजपर्यंतचा प्रवास आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान महिला अधिकाऱ्यांनी यापूर्वीही अशा भूमिका पार पाडल्या असून पथकांचे नेतृत्वदेखील केलं आहे.