Eid-e-Milad un Nabi Mubarak 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, देवेंद्र फडणवीस, आदी दिग्गजांनी मुस्लिम बांधवाना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या 'ईद-ए-मिलाद' च्या शुभेच्छा!
Eid-e-Milad un Nabi Mubarak 2019 (PC - PTI)

Eid-e-Milad un Nabi Mubarak 2019: आज संपूर्ण देशभरात ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी' (Eid-E-Milad-Un-Nabi) हा मुस्लिम बांधवाचा सण उत्साहात साजरा होत आहे. हा सण मुस्लिम बांधवांच्या अनेक मोठ्या सणांपैकी एक मानला जातो. मुस्लिम बांधव पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून हा सण साजरा करतात. 12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का (Makka) येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता.

हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबी (Eid-e-Milad Un Nabi) च्या रूपात साजरा केला जातो. याच दिवसाचे निमित्त साधून देशभरातील अनेक दिग्गजांनी आपल्या मुस्लिम बांधवाना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - Eid-E-Milad-Un-Nabi 2019: ‘ईद-ए-मिलाद' यंदा 10 नोव्हेंबरला; जाणून या ईदचा इतिहास, महत्त्व आणि परंपरा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद  - 

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत - 

राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड - 

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे - 

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील ती वादग्रस्त जमीन ही रामलल्ला म्हणजे हिंदू पक्षांना बहाल करण्यात आली. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. या निकालाचे राज्यासह देशभरात सर्व जाती-धर्मातील लोकांनी स्वागत केले. न्यायालयाच्या या निर्णयाचा मुस्लिम बांधवांनीदेखील स्विकार केला आहे.