Ganga Vilas Cruise: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जगातील सर्वात लांब क्रूझ गंगा विलास क्रूझ (Ganga Vilas Cruise) ला ग्रीन सिग्नल (Green Signal) दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील रविदास घाटावरून गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा दाखवला. ही क्रूझ 52 दिवसांत 3200 किमी अंतर कापणार आहे. ही क्रूझ अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ही क्रूझ 50 ठिकाणांवरून जाईल, ज्यामध्ये पर्यटकांना केवळ गंगेचा किनाराच दिसणार नाही, तर इथल्या संस्कृतीची झलकही पाहायला मिळेल. (हेही वाचा - World's Longest Luxury River Cruise: वाराणसीपासून सुरू होणार जगातील सर्वात लांब Ganga Vilas Cruise ट्रिप; 50 दिवसांत पूर्ण करणार 3200 किमी प्रवास)
गंगा विलास क्रूझचे भाडे किती असेल?
गंगा विलास क्रूझमध्ये जिम, स्पा सेंटर, लेक्चर हाऊस, लायब्ररी आदी सुविधा आहेत. क्रूझ राईडसाठी, तुम्हाला दररोज 50,000 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने 51 दिवस प्रवास केला तर त्याला 25 लाख रुपये द्यावे लागतील. या पंचतारांकित क्रूझचे तिकीट अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझच्या www.antaracruise.com या वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकते. क्रूझचे भाडे बदलू शकते. म्हणजे वाराणसीहून पाटण्याला जायचे असेल तर त्याचे भाडे वेगळे असेल. प्रति व्यक्ती किमान भाडे रु 25,000/रात्र म्हणजेच $300 आहे.
Prime Minister Narendra Modi will flag off the world's longest river cruise MV Ganga Vilas between Varanasi-Dibrugarh today. pic.twitter.com/bOFpfvzFxm
— ANI (@ANI) January 13, 2023
गंगा विलास लक्झरी क्रूझ मार्ग -
गंगा विलास लक्झरी क्रूझ भारत आणि बांगलादेशमधून जाणाऱ्या 27 नद्यांमधून आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचेल. या लांबच्या प्रवासात एमव्ही गंगा विलास क्रूझ पाटणा, साहिबगंज, कोलकाता, ढाका आणि गुवाहाटी सारख्या 50 पर्यटन स्थळांमधून जाणार आहे. सुंदरबन डेल्टा आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमधूनही ही क्रूझ जाणार आहे. ही क्रूझ यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि आसामच्या एकूण 27 नदी प्रणालींमधून जाईल.