PM Narendra Modi Flags Off 8 Trains Connecting Statue of Unity in Kevadia: केवडियातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'साठी मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान मोदी यांनी 8 रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा कंदिल
PM Narendra Modi flags off eight trains (PC - ANI)

PM Narendra Modi Flags Off 8 Trains Connecting Statue of Unity in Kevadia: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केवडियामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला देशाच्या विविध प्रांतांसह जोडणार्‍या आठ रेल्वे गाड्यांना हिरवा कंदिल दाखवला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाचं आठ गाड्यांना एकत्र हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या आठ गाड्या केवडिया वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडतील. या योजनेमुळे जगातील सर्वात मोठी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भारतीय रेल्वेच्या नकाशावरही जागा मिळेल. तसेच केवडियाच्या रेल्वे लिंकला जोडल्याने पर्यटकांना कोणतीही त्रास न होता देशभरातून येथे पोहोचता येणार आहे.

या ट्रेनमुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अन्य शहरांतील लोक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यास सक्षम असतील. आतापर्यंत याठिकाणी पोहोचण्यासाठी कोणतीही थेट ट्रेन नव्हती. लोकांना वडोदरावरून केवडियाला यावे लागत असे. मात्र, आता या ठिकाणी पोहचण्यासाठी इतर गाड्यांप्रमाणेच विशेष ट्रेन म्हणून या आठ रेल्वे गाड्या धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी प्रवाशांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड वेबसाइट किंवा मोबाइल अ‍ॅपवरून तिकिट बुक करावे लागतील. (वाचा - PM Modi Launches COVID-19 Vaccination Drive: ‘Dawai bhi, Kadai bhi’ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला नवा मंत्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळील केवडिया रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केलं. या व्यतिरिक्त त्यांनी ब्रॉडगेज लेनचेही उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, आता केवडिया देशातील छोटे शहर नाही. केवडियामध्ये अनेक पर्यंटक सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा पाहण्यासाठी येतात. आतापर्यंत 50 लाख लोकांनी हा पुतळा पाहिला आहे. एका अभ्यासानुसार काही दिवसांनी दररोज 1 लाख लोक पुतळा पाहण्यासाठी पोहोचतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट - 

पंतप्रधान या गाड्यांना दाखवला ग्रीन सिग्नल -

09103/04 केवडिया ते वाराणसी महामना एक्स्प्रेस (साप्ताहिक)

02927 / 28 दादर ते केवडिया दादर केवडिया एक्सप्रेस (दैनिक)

09247 / 48 अहमदाबाद ते केवडिया, जनशताब्दी एक्सप्रेस (दैनिक)

09145 / 46 केवडिया ते हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस (आठवड्यातून 2 दिवस)

09105 / 06 केवडिया ते रीवा, केवडिया रीवा एक्सप्रेस (साप्ताहिक)

09119 / 20 चेन्नई ते केवडिया, चेन्नई केवडिया एक्सप्रेस (साप्ताहिक)

09107 / 08 प्रतापनगर ते केवडिया मेमू ट्रेन (दैनिक)

09109/10 केवडिया ते प्रतापनगर मेमू ट्रेन (दैनिक)

पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि ट्रेनचा प्रवास अधिक सुंदर व संस्मरणीय बनविण्यासाठी या ट्रेनची खास रचना करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, या रेल्वे गाड्यांचे डिझाईन अतिशय प्रभावी आहे. या गाड्यांच्या प्रवासादरम्यान, लोकांना नर्मदाच्या घाटाच्या विस्तीर्ण दृश्यांचा आनंद घेता येईल.