PM Modi Varanasi Visit: PM मोदी आज दुसऱ्या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवणार, लाखो प्रवाशांना होणार फायदा
Vande Bharat Train, PM Modi (PC - ANI)

PM Modi Varanasi Visit: वाराणसी ते दिल्ली प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) काशी ते दिल्ली (Kashi to Delhi) या दुसऱ्या वंदे भारत ट्रेनला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवतील. या मार्गावर दुसरी वंदे भारत चालवल्यास लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. दुसरी वंदे भारत ट्रेन चालवल्याने दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते दिल्ली दरम्यानचा प्रवास सुकर होईल. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी वंदे भारत ट्रेन सकाळी 6 वाजता वाराणसीहून सुटेल आणि प्रयागराज, कानपूरमार्गे दुपारी 2 वाजता नवी दिल्लीला पोहोचेल. यानंतर ही ट्रेन नवी दिल्लीहून वाराणसीला दुपारी 3 वाजता परतेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे दोन दिवसांच्या (17 आणि 18 डिसेंबर) दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये विकास भारत संकल्प यात्रेला संबोधित केले. ते म्हणाले, विकास भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी सरकार, राजकारण आणि सामाजिक कार्याशी निगडित देशातील सर्व लोक आपला वेळ देत आहेत. त्यामुळे खासदार म्हणून या कार्यक्रमाला वेळ देणे ही माझी जबाबदारी आहे. (हेही वाचा - Surat Diamond Bourse: PM मोदी आज करणार जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट 'सुरत डायमंड बोर्स' कार्यालयाचे उद्घाटन, See Photos)

दरम्यान, उत्तर रेल्वेने आपल्या प्रेस स्टेटमेंटसह भगव्या रंगात ट्रेनचा फोटोही शेअर केला आहे. याशिवाय, NR ने सांगितले आहे की, ट्रेनमध्ये ऑनबोर्ड वाय-फाय इंफोटेनमेंट, GPS-आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटीरियर्स, टच-फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत. (ICMR Imp Data Leaked On Dark Web: भारतीय नागरिकांची खाजगी माहिती डार्क मोड वर लीक केल्याच्या आरोपाखाली 4 जण अटकेत)

जंतूविरहित हवेच्या पुरवठ्यासाठी यात अतिनील दिव्यासह उत्तम उष्णता वायुवीजन आणि वातानुकूलित यंत्रणा आहे. या ट्रेनमध्ये इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टम हवामानाच्या परिस्थितीनुसार कूलिंगची सुविधा देण्यात आली आहे.