Independence Day 2023: भारत यावर्षी 77 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून दहाव्यांदा तिरंगा फडकवून देशाला संबोधित करणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 'हर घर तिरंगा आंदोलना'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे.
रविवारी एका ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक घरातील तिरंगा आंदोलनाचा एक भाग असल्याने आपण सर्व देशवासियांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा डीपी (डिस्प्ले पिक्चर) बदलला पाहिजे. हे पाऊल देशाची एकता आणि अखंडता अधिक दृढ करेल. (हेही वाचा - Azadi Ka Amrit Mahotsav 2023: जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी काढली तिरंगा रॅली, पहा व्हिडिओ)
पंतप्रधान मोदींनी विनंती केली आहे की, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा ध्वजाचे छायाचित्र टाकावे. पंतप्रधानांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या डिस्प्ले पिक्चरमध्ये तिरंगा ध्वजाचे छायाचित्रही अपडेट केले आहे.
In the spirit of the #HarGharTiranga movement, let us change the DP of our social media accounts and extend support to this unique effort which will deepen the bond between our beloved country and us.
— Narendra Modi (@narendramodi) August 13, 2023
प्रत्येक घराघरात तिरंगा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय ध्वज हे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. 'हर घर तिरंगा' वेबसाईटवर अधिकाधिक लोकांनी तिरंग्यासह त्यांची छायाचित्रे अपलोड करावीत, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, तिरंगा हे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. प्रत्येक भारतीयाचा तिरंग्याशी भावनिक संबंध आहे आणि तो आपल्याला पुढे राष्ट्रीय प्रगतीसाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो.