Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

कच्या तेलाच्या (Crude Oil) किंमती वाढल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किंमतीत वाढ झाली आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 40 डॉलर्स प्रति बॅरल झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 16 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आला होता.

कच्या तेलाच्या बॅरलमागील किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 60 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. तसेच याआधी काही राज्य सरकारांनी महसूलात वाढ करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरी वॅटच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. (हेही वाचा - दिलासादायक! सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून नष्ट होईल Coronavirus; नवीन रिपोर्टमध्ये दावा, जाणून घ्या सविस्तर)

असे आहेत पेट्रोल-डिझेल नवे दर -

नवी दिल्ली - पेट्रोल 71.86 रुपये आणि डिझेल 69.99 रुपये

मुंबई - पेट्रोल 78.91 रुपये आणि डिझेल 69.79 रुपये

चेन्नई - पेट्रोल 76.07 रुपये आणि डिझेल 68.74 रुपये

हैदराबाद - पेट्रोल 74.61 रुपये आणि डिझेल 68.42 रुपये

बंगळुरू – पेट्रोल 74.18 रुपये आणि डिझेल 66.54 रुपये

गुरूग्राम - पेट्रोल 71.68 रुपये आणि डिझेल 63.65 रुपये

दरम्यान, केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क वाढून 22.98 रुपये प्रति लिटर केले होते. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढून 18.83 रुपये प्रति लीटर करण्यात आले होते.